हाॅटेल व्यावसायिकाकडून तरुणास बेदम मारहाण!
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील येथे एका कायम स्वरुपी वादग्रस्त असलेल्या आणि अनैतिक व्यवसाय सुरु असलेल्या एका हाॅटेलवर चिंचोली गावतील एका 30 वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी लोखंडी रॅड, गज, लाठी, काठीने अमानुषपणे पाठीवर हातावर मांडीवर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सदर प्रकार मागील प्रकरणातुन झाला असुन दिं. 26 रोजी सायंकाळी 6 वाजे दरम्यान हाॅटेल मालकासह तेथे असलेल्या गूंड प्रवृत्तीच्या तरुणांनी केली आहे असे फिर्यादीकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित तरुण राहुरी पोलिसात तक्रार देण्यासाठी दाखल झाला असून राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
राहुरी फाॅक्टरी ते चिंचोलो फाटा दरम्यान योगेश भगवान उर्हाडे वय वर्ष 30 राहणार चिंचोली हा हाॅटेल न्यु प्रसाद येथे गेला असता तेथे असलेल्या चार पाच लोकांनी अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात हा तरुण तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता पोलिसांनी सुरवातीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली मात्र सदर तरुणानी वृत्तपत्राचे स्थानिक प्रतिनिधी यांना संपर्क केला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.





