- राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत ना. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वर्षा गायकवाड हजर होत्या. शिक्षणमंत्र्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना चाचण्या करण्याचं आवाहन केलं आहे.
- मुंबईसह राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत आहे. मागील काही दिवसात राज्यात तिप्पटीने रुग्णवाढ झाली असून, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
- वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. काल (27 डिसेंबर) सायंकाळी लक्षणं जाणवल्याने चाचणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळालं. मला सौम्य लक्षणं आहेत. सध्या प्रकृती चांगली असून, स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.मागच्या वर्षी ना.गायकवाड पॉझिटिव्ह आल्या होत्या.





