औरंगाबाद विशेष रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणेच होय; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा

661

  • सविस्तर माहिती अशी की, परमेश्वर ढगे हा जुलै 2014 मध्ये सायंकाळी पीडीतेच्या घरी गेला होता. तेथे गेल्यानंतर पीडितेकडे तिच्या पतीची चौकशी केली. पीडीतेने पती बाहेर गेला असून आज रात्री येणार नसल्याचे परमेश्वरला सांगितले होते.
  • त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परमेश्वर पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्यावेळी पीडिता खाटेवर झोपली होती. परमेश्वराने घराचा दरवाजा उघडला व तो तिच्या जवळ खाटेवर बसला व तिच्या पायाला स्पर्श केला.
  • या प्रकरणी जालना जिल्ह्यातील परमेश्वर ढगे याला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
  • त्या निर्णयाविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते, त्याची सुनावणी न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांच्यासमोर झाली. यावेळी मध्यरात्री एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले.
  • दरम्यान, परमेश्वरने आपला विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर न्यायमूर्ती सेवलीकर म्हणाले, रेकॉर्डवरील नोंदीनुसार परमेश्वरचे कृत्य हे महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते. रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरी जाण्याचे लैंगिक हेतूशिवाय अन्य कोणतेही कारण नव्हते. तसेच घरी गेल्यावर पीडितेच्या जवळ तिच्या खाटेवर बसून तिच्या पायाला स्पर्श करणे हे त्याचे वर्तन लैंगिक हेतूनेच होते. शिवाय एवढच्या रात्री पीडितेच्या घरी जाण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण समाधानकारक देऊ शकला नाही. शिवाय, रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणेच होय. त्यामुळे परमेश्वर याने लैंगिक हेतूने शेजारील महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला असून कनिष्ठ न्यायालयाने परमेश्वरला दोषी ठरवण्यात कोणतीही चूक केली नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here