“अनाधिकृत नळजोडणी आता नव्या वर्षात नियमित होणार औरंगाबाद महानगरपालिकेची ‘अभय ‘ योजना

418
  • औरंगाबाद महापालिकेने अनधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. शुक्रवारी यासाठी महापालिकेने एक ठराव घेतला. 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत ही योजना लागू राहिल. तसेच या कालावधीत नळ अधिकृत न घेणाऱ्या मालमत्ताधदारकांवर मनपा कारवाई करणार आहे.
  • *काय आहे “अभय योजना”*
  • ▪️मनपा प्रशासनाने शुक्रवारी एक ठराव घेतला. त्यानुसार पाणीपुरवठा खंडित करण्याचे शुल्क, अवैध पाणी वापर शुल्क, अवैध जोडणी नियमितीकरण शुल्क, पुन्हा जोडणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दीड इंचापर्यंतच्या नळ जोडणीचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी निवासी सुल्क पाचशे रुपये तर व्यावसायिक शुल्क एक हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.
  • ▪️ दीडशेपेक्षा अधिक इंचाचे नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी निवासी शुल्क तीन हजार रुपये ठरवण्यात आले आहे. अवैध पाणी वापर शुल्क सरसकट पाच हजार असेल. नळ कनेक्शनची पुन्हा जोडणी शुल्क निवासी वापरासाठी पाचशे ते एक हजार रुपये आणि व्यावसायिक वापरासाठी एक हजार ते 2250 रुपये एवढी निश्चित कऱण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here