राज्यातील थंडी कमी होणार, काही दिवसात गारपिट आणि पावसाचा इशारा

516

Weather Updates :  राज्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत असताना आता पाऊसही बसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. महाराष्ट्रात 28-29 डिसेंबर रोजी काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, थंडीची लाट काही प्रमाणात ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

राज्यातील गारवा कमी होणार असून पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच उत्तर खान्देश, विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या शहरांत २८ आणि २९ डिसेंबर या दोन दिवशी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातही तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवार, 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here