पतंग उडवताना अपघात, टेरेसवरुन पडल्याने पोटात घुसली सळई, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

598

Buldana Accident : पतंग उडवताना तोल जाऊन गच्चीवरुन पडल्याने बुलढाण्यात एका 13 वर्षीय मुलाला गंभीर जखम झाली आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील रावण टेकडी भागात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. यावेळी पतंग उडवताना पडलेल्या मुलाच्या पोटात आरपार लोखंडी सळई घुसली आहे. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

सदर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. खामगाव शहरातील रावण टेकडी परिसरातील रुद्र राजेंद्र लुलेकर (वय 13) हा आपल्या मित्रांसोबत एका घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. यावेळी पतंगाच्या नादात त्याचा तोल गेल्याने तो गच्चीवरून खाली पडला. त्यावेळी जमिनीत रोवलेली लोखंडी सळई त्याच्या पोटात आरपार घुसली. ज्यानंतर आसपासच्या नागरिकांनी धाव घेत सळई कापून रुद्रला सळई सोबतच सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या पोटातील सळई काढण्यासाठी आणि पुढील उपचाराकरीता त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पतंग उडवताना ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्काक बसला आहे. त्यात पालकांची चिंताही या घटनेमुळे वाढली आहे. कारण अशाप्रकारच्या घटनानंतर पालकांचं मुलांकडे लक्ष आहे का? असेच प्रश्न उपस्थित होतात. दरम्यान या घटनेनंतर लहान मुलांना खेळताना त्यांची काळजी ते घेत आहेत का? याबाबत पालकांनी लक्ष देणंही गरजेचं झाले आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here