नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.
देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 108, दिल्लीमध्ये 79, गुजरातमध्ये 43 , तेलंगाणा 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटक 31, राजस्थानमध्ये 22, हरयाणा 4, ओडिशा 4, आंध्र प्रदेश 4 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंदीगढ 1, लडाख1, उत्तराखंडमध्ये 1 रुगणाची नोंद झाली आहे.
देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झालीय मात्र देशातील 115 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 42, दिल्लीमध्ये 23, गुजरातमध्ये 05, केरळमध्ये 1, कर्नाटक 15, राजस्थानमध्ये 19, हरयाणा 2, आंध्र प्रदेश 1 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 1, उत्तर प्रदेश 2, लडाख1 येथील रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनच्या 11 नव्या रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली आहे. मुंबईतील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. त्यापैकी 19 जणांना बरं झाल्यानं डिस्चार्ज देण्या आला.
>> चाचणी आणि पाळत ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चाचण्या केल्या पाहिजेत. घरोघरी केस शोधण्याची आणि आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवायला हवी.





