प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या!
सांगली – तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तीन जणांच्या मृतदेहाशेजारी या तिघांच्या मृतदेहाजवळ द्राक्षबागेसाठी वापरले जाणारे विषारी औषधाची बाटली सापडली आहे.चॉकलेट्स आणि पुष्पगुच्छही आढळले आहेत. विषारी औषध प्राशन करून तिघांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आली आहे. मात्र, आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने झालीय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावर पहाटेच्या सुमारास प्रेमाच्या त्रिकोणातून या तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तिघांनीही द्राक्ष बागेवर फवारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. परिसरातील काही स्थानिक नागरिकांना या तिघांचे मृतदेह सकाळी आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी), प्रणाली पाटील आणि शिवानी घाडगे अशी मयत तरुण आणि तरुणींची नावे आहेत. या तीनही जणांच्या मृतदेहाजवळ दोन पुष्पगुच्छ, तीन ग्लास, हार,चाॅकलेट्स आणि विषारी कीटकनाशकाची बाटली सापडली आहे. या तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का? याचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.











