महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येण्याचं समजतंय.शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पुन्हा कोरोना कृती दलासोबत व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. केंद्र सरकारने ओमिक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेत राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्सवांवर प्रतिबंध आणण्याचा सल्ला राज्यांना आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कालच्या बैठकीत राज्यांना या सूचना ▪️ नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा. आवश्यक तेथे किमान 14 दिवस निर्बंध लावावेत.▪️ टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्यावे. आयसीएमआरने आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.▪️ हॉस्पिटलमध्ये बेड, अँम्ब्युलन्स आणि आरोग्य उपकरणे वाढविण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवा. तसेच 30 दिवसांच्या औधांचा साठा करावा.▪️ लोकांना सतत माहिती दिली जावी. अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी राज्यांनी दररोज माहिती द्यावी.▪️राज्यांनी 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे. सर्व पात्र लोकांना दोन डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी दारोदारी जाऊन अभियान राबवावे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध...
“कर्नाटक 2023 चा भारत 2024 वर कोणताही परिणाम नाही”: केंद्रीय मंत्री एनडीटीव्हीला
बेंगळुरू: कर्नाटक 2023 चा भारत 2024 वर कोणताही परिणाम नाही, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज एनडीटीव्हीला...
पोलिस उप महानिरिक्षक बी जी शेखर सात दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर
पोलिस उप महानिरिक्षक बी जी शेखर सात दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर
पोलिस ठाण्यासह उपविभागीय कार्यालयाचेही होणार इन्स्पेक्शनवार्षिक...
स्थानिक बाजारात खरेदी करा ़।
प्रिय मित्रांनो,
गेल्या काही तासात online company वर ७८०कोटीचे मोबाईल ४३०कोटीचे स्मार्ट TV व ३९० कोटीचे घरगुती साहित्य विकले...





