ब्रेकींग न्यूज
राहुरी कारागृह फोडून आरोपी पलायन प्रकरणात पीएसआय सह सहा जनांवर निलंबनाची कारवाई, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांचे आदेश,
राहुरी : आरोपी पलायनप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह सहाजण निलंबित आरोपी पलायनप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह सहाजण निलंबित
अहमदनगर |प्रतिनिधी| राहुरीच्या कारागृहामधून पाच आरोपींनी पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्यांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार, व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.शनिवारी पहाटे राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यातील आरोपी सागर भांडसह पाच जणांनी पलायन केले होते. यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. तर अन्य दोघे अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. देशाचे गृहमंत्री जिल्ह्याच्या दौर्यावर येण्यापूर्वीच आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट दे ऊन पाहणी केली. याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी चौकशी केली. काहींचे जबाब नोंदविले. चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक पाटील यांना सादर केला. यानंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्यांचे निलंबन केले आहे.





