वाळू चोरी करताना ट्रॉली उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर

496

वर्धा : नाल्यातून वाळू चोरी करुन वाहतूक करताना ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात सोमवारी हा प्रकार घडला.

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू चोरी करताना ही घटना घडली. वाहतूक करत असताना ट्रॉली उलटली आणि दोघा जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अडेगाव येथे घडली.

अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. अनिल सुरेश लाकडे (वय 33 वर्ष) आणि ऋतिक दिनेश वानखेडे (वय 24 वर्ष) (दोघेही रा. इंदिरानगर देवळी) अशी मयत तरुणांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ट्रॅक्टर चालक शंकर मनोहर भानारकर, सागर विजय पारिसे, शिवराम डोंगरे, सचिन नांदूरकर आणि गजानन भानाकर (सर्व रा. इंदिरा नगर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here