वायव्य भारतातून थंडीला सुरूवात झाली असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट धडकली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. *पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार..* हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे. *राज्यात गारठा वाढला..!* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला असून पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायमq राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सकाळी आणि सायंकाळी तापमान सरासरी तापमानापेक्षा खाली घसरत आहेत. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे.▪️ आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं ताप वामान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. तर दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
नवी मुंबई : संपूर्ण देशवासीयांना प्रतीक्षा असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या उंबरठ्यावर आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस विमानतळाचे...
जिल्ह्यात 24 तासात तब्बल 3117 नवीन बाधितांची भर पडली आहे
जिल्ह्यात 24 तासात तब्बल 3117 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 898 रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत.अहमदनगर 898, राहाता...
प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सामुदायिक महाभिषेकाचे आयोजन:
मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख मित्र मंडळ यांच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सामुदायिक...
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदींची ३५ मिनिटं फोनवर चर्चा, थोड्याच वेळात पुतीन यांनाही फोन करणार!, नेमकं...
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या घडामोडींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारमधील टॉप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान...