नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक टोला“माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांचं ‘ओएसडी’ व्हावं तर सोमय्यांना…”; नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक टोला महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे.माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांना सूचना देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बराच रस घेत आहेत. त्यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे, नाहीतरी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त्यांचा भरपूर अनुभव आहे. तर किरीट सोमय्या यांनी तपासयंत्रणांचा प्रवक्ता म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी, असा टोला नवाब मलिक यांनी ट्विट करुन लगावला आहे.’तसेच ‘उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत’, अस सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केलं आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.दरम्यान नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या आरोपांचा सपाटा लावला होता. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपासयंत्रणांच्या सदोष भूमिकेवर नवाब मलिक यांनी बोट ठेवले होते. ही दोन्ही प्रकरणे नवाब मलिक यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. या सगळ्यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे आपल्या घरी लवकरच ईडी किंवा सीबीआयची धाड पडेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या घरावर खरंच तपासयंत्रणांची धाड पडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
आधारकार्डचा जथ्था खिशात ठेवलेला मृतदेह, नऊ महिन्यांनी रहस्य उलगडले
महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यात दिसून येत आहे. बीड इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून...
संतोष देशमुख हत्याप्रकरण: वकिलाच्या दाव्यानंतर आका कोण हे समोर आले, सुरेश धस यांनी स्पष्ट...
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अपहरण प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे...
शिल्पा शेट्टीला १२० टक्के माहित असणार…! शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांचा आरोप !
शिल्पा शेट्टीला १२० टक्के माहित असणार…! शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांचा आरोप !
यूपी पुरुष ज्याने माजी गळफास घेतला तिला तिच्या लग्नाबद्दल कळले होते, ते भारतात परतले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. (प्रतिनिधित्वात्मक)
आझमगढ: उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये झालेल्या भीषण हत्याकांडात एका...