गारठा वाढणार, राज्यात गुलाबी थंडीसाठी अनुकूल वातावरण..!

424

राज्यात गुलाबी थंडीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसांत रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रात्रीच्या किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते.. सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसू शकतो. सध्या ढगाळ वातावरण निवळले असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरु झालाय. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचे सांगण्यात येते.. येत्या चार दिवसांत रात्रीच्या तापमानात 4 ते 5 अंशाने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. *रुग्णांनी काळजी घ्यावी*हिवाळ्यात तापमान घसरल्यावर सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार वाढतात. शिवाय सांधेदुखी, श्‍वसनाचे विकार, दमा, ऍलर्जी, जुन्या दम्याचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here