राज्य सरकारकडून सिटीस्कॅनसह प्लाझ्माचे दर निश्चित
? कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून 5500/- इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे.
? यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहणार आहे अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
? प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकरण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे.
? त्यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास याचाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किमती व्यतिरक्त) केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.
➖➖_