रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी : रावसाहेब दानवे

453

१ जानेवारीपासून मराठवाड्यातून पुण्यापर्यंत नवीन रेल्वे सुरू होणार आहे. सुरुवातीला ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.▪️तर दुसरीकडे परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण दोन टप्प्यात करण्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.▪️ पहिल्या टप्प्यात औरंगाबाद ते अंकाई या ९८ किलोमीटरच्या भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी देण्याचे आदेश शुक्रवारी प्राप्त झाले असून अंकाईत पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर समांतर कोडलाइन (बायपास) टाकण्याची परवानगी मिळाल्याने आता मनमाडला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी 32 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, मुदखेड ते परभणी रस्त्याचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून परभणी ते मनमाडपर्यंतचे दुहेरीकरण करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वे बोर्डाने नीती आयोगाकडे ही मागणी केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा निधी मिळू शकतो, मात्र मंत्रिमंडळाने रेल्वे खात्याच्या बजेटमधून 500 कोटींच्या आतच कामे होऊ शकतात असे सांगून हा प्रस्ताव फेटाळल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. मनमाड ते अंकाई या चार किमी मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले आहे. आता औरंगाबाद ते अंकाई रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम याच योजनेतून होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादहून परभणीचे दुहेरीकरण केले जाणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. *नवीन रेल्वे वेळापत्रक* गाडी नांदेड येथून 1 व 2 जानेवारी रोजी सुटेल. 9.30 वाजता जालना आणि 10.30 वाजता औरंगाबादला पोहोचेल.औरंगाबादहून रात्री 10.30 वाजता सुटल्यानंतर ती सकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचेल. व परतीच्या प्रवासात हीच गाडी पुण्याहून रात्री 9:30 वाजता सुटून पहाटे 4:30 ते 5 वाजता औरंगाबादला पोहोचेल. या ट्रेनला प्रथम, द्वितीय आणि तृतीय वातानुकूलित श्रेणीचा प्रत्येकी एक डबा असेल. स्लीपर क्लासचे इतर डबेही असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here