कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून… सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तिच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना काही अडचण असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत जिल्हा आणि महापालिका स्तरावर मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास आपल्या मोबाईलवरून स्वत:चा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र व रुग्णालयाचा तपशील या कागदपत्रांच्या आधारे लॉगइन करता येणार आहे. अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.यांना कागदपत्रांची गरज नाही…केंद्र शासनाकडे ज्यांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तिंच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी कोविड-19 मुळे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील माहितीची शहानिशा करून मंजूर करण्यात येणार आहेत. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक…– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक.– अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील.– मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक– मृत व्यक्तीचे वैद्कीय प्रमाणपत्र (Medical Certificate of cause of Death)– मृताचा RT-PCR/Molecular Tests/RAT Positive अहवाल– मृताच्या रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांचा अहवाल– अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोविड-19 मुळे झाल्याचे सिद्ध करत असेल, अशी इतर कोणतीही कागदपत्रे.– मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र– इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचा स्वयं घोषणापत्र
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
आरबीआय गर्व्हनर करोनाबाधित
नवी दिल्ली – अनेक नामांकित आणि उच्च पदस्थांना करोनाव्हायरसची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता देशातील सर्वोच्च बॅंक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई नियामक मंडळाची सभा दि.६ ऑक्टोबर २०२१ रोजी शरद...
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई नियामक मंडळाची सभा दि.६ ऑक्टोबर २०२१ रोजी. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे नाट्य परिषदेचे...
मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस बदलून ४ डिसेंबर करण्यात आला
भारतीय निवडणूक आयोगाने मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार...
राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पोलिस...