माेदी सरकारने विविध समाज घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. आता मोदी सरकारने गाव-खेड्यात राहणाऱ्या महिलांसाठी खास सेवा सुरु केली आहे.. त्याचे नाव आहे, ‘ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी’…!स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत ही सेवा सुरु केली. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ५,००० रुपयांचा ‘ओव्हर ड्राफ्ट’ देण्यात येणार आहे. महिलांसाठी हे एक प्रकारचे कर्जच असेल. मात्र, या सुविधेमुळे महिलांना बॅंक खात्यातून शिल्लक रकमेपेपेक्षा जादा पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर एका निश्चित कालावधीत ही रक्कम परत करावी लागणार आहे. शिवाय त्यावर व्याजही आकारले जाणार आहे.कोणतीही बॅंक किंवा बिगर बॅंकिग वित्तीय कंपनी (NBFC) ‘ओव्हर ड्राफ्ट’ची सुविधा देऊ शकते. अर्थात, वेगवेगळ्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’साठी ही मर्यादा वेगवेगळी असू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९-२० मध्ये अर्थसंकल्पीय भाषणात याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील महिला समूहांतील सदस्यांकरिता ही सेवा सुरु करण्यात आली आहे.. महिला स्वयंसहायता गटातील सदस्यांना ही सुविधा मिळणार आहे.‘ओव्हर ड्राफ्ट’ सुविधा सुरू करण्याबाबत भारतीय बॅंक संघाने सर्व बॅंकाना सूचना केल्या आहेत. सोबतच या योजनेबाबत इतर माहितीदेखील देण्यात आली आहे. बॅंकांची दारे महिलांसाठी खुलीदरम्यान, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनची सुरूवात जून-२०११ मध्ये करण्यात आली होती. ग्रामीण विकास मंत्रालयाची ही एक प्रमुख योजना आहे. निर्धन महिला स्वयंसहायता समूहांना आर्थिक मदत, तसेच बॅंकांची दारे महिलांसाठी खुली करण्याचा योजनेचा उद्देश आहे.योजनेच्या माध्यमातून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत २७.३८ लाख महिला गटांना ६२,८४८ कोटी रुपयांचे कर्जे बॅंकांनी दिले आहेत. एप्रिल २०१३ नंतर ४.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे वितरित केली आहेत. या कर्जावरील देखरेख करण्यासाठी समितीही नेमली असल्याचे सांगण्यात आले.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
नवीन संरक्षण स्वदेशीकरण यादीत भविष्यकालीन शस्त्रे, प्रणाली आहेत
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी 98 वस्तूंची पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी (पीआयएल) जारी केली जी तीन...
पोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा मिळणार ,भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम
पोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा मिळणार ,भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम
पोटहिस्स्याचा म्हणजे जमीन वाटपाचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी भूमी...
राजस्थान निवडणूक: भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीनंतर दिवसभर अस्वस्थता
23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 41 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर,...
UP Kasganj Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात;भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात
नगर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कासगंज जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी मोठा रस्ता अपघात (Accident) झाला...




