रामदास कदमांचा खळबळजनक आरोपरत्नागिरी शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार नेते आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, असे सांगत पालकमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.मला शिवसेनेतून संपविण्याचा परबांनी विडा उचला आहे. माझे किरीट सोमय्या यांच्याशी कोणतेही संबंध नाही. मी त्यांना कोणतीही कागदपत्रं दिलेले नाही. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी पक्षप्रमुखांना पत्र दिले होते. पक्षाला हानी होईल, अशी माझी कोणतीही भूमिका नाही, असे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलतांना कदम म्हणाले की, “माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही.त्याचबरोबर “अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष असल्याचं देखील कदम यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.तसेच माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे मला सगळे माहित आहे,” असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत ? ज्यांनी शिवसेना मोठी केली त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अनिल परब राष्ट्रवादी नेते असल्यासारखे वागत आहेत. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की अनिल परब, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, असे रामदास कदम म्हणाले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आलं. कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे आमदार आहेत. असं असतानाही कदम समर्थकांना संघटनेच्या कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने कदम हे अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातं आहेत.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
डिजिटल मिडिया विषयी बेजाबरदार वक्तव्य करणाऱ्या माहिती संचालकास बडतर्फ करा : राज्यमंत्री श्री. एकनाथ...
महा डिजिटल मिडिया असोसिएशन ची मागणी.राज्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यां चा अहमदनगर दौरा .निवेदनाद्वारे मागणी:अॅड. शीतल बेद्रे , अॅड.पल्लवी केदारे.
जिल्ह्यात आज इतक्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर: जिल्ह्यात आज 29 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 966 इतकी झाली...
राहुल गांधी त्यांच्या स्वयंसेवक सेवेचा भाग म्हणून सुवर्ण मंदिराला भेट देतात, भांडी धुतात
अमृतसरला एक दिवसाच्या “वैयक्तिक, आध्यात्मिक भेटीवर” असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सुवर्ण मंदिराला भेट दिली...
चक्रीवादळ ‘मंडूस’: खोल मंदीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता, तामिळनाडूला धडक; तंजावरमध्ये एनडीआरएफ तैनात
तामिळनाडूमध्ये संततधार पावसाच्या अपेक्षेने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथक तंजावरमध्ये पूर्वस्थितीत आहे. बंगालच्या उपसागरावर...