मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र?

453

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी शिवसेना आणि काँग्रेस एक समान रणनीतीवर काम करू शकतील, असे सूत्रांकडून समजते. शिवसेना आणि काँग्रेस आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आले आहेत, तरी भाजपचा राज्यात विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुकीत झालेला विजय महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र येण्यास भाग पाडत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची पाळेमुळे मुंबईत घट्ट रोवलेली असली प्रतिष्ठेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला तो स्वबळावर हरवू शकेल का हा प्रश्न आहे. 

दुसरे म्हणजे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याने २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत आपली ताकद दाखवून दिली होती. परंतु, त्यानंतर काँग्रेसचा आलेख फक्त आर्थिक राजधानी मुंबईत नव्हे, तर राज्यातच खाली चाललेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांचे एकत्र येणे शक्य आहे का, असे विचारल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘हे शक्य नाही’ असे उत्तर दिले. 

काँग्रेसचे व्यवस्थापक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्याशी याबाबत झालेल्या भेटींबद्दल शब्दही बोलायला तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here