एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर 15 ते 19 डिसेंबरलाअंबिका उद्योग समूह आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाउद्योजकांच्या पुढाकाराने क्रिकेट संघांना व खेळाडूंना भरघोस रोख बक्षिसेनगर –

521

नगरमधील अंबिका उद्योगसमूह संचलित अंबिका क्रिकेट क्लबच्या वतीने दि. 15 ते 19 डिसेंबर 2021 दरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी जिमखाना मैदानावर संपन्न होत असलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघाकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. 6 षटकांत सामना असेल. विजेत्या संघांना रोख पारितोषिक देण्यात येणार असून, प्रथम विजेत्या संघास 51000, उपविजेत्या संघास 31000, तृृतीय विजेत्या संघास 21000 व चौथ्या संघास 11000 पारितोषिक दिले जाईल. याशिवाय वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व खेळाडूस प्रत्येकी 3100 रुपयांचे बक्षिस दिले जाईल.या स्पर्धेचे यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. स्पर्धा आयोजनासाठी एमआयडीसीतील उद्योजक केशव नागरगोजे, विनायक भोर, बाळासाहेब बडे, कुंडलिक कातोरे, संतोष भोसले, अंकुश बडे, सुनील खामनेकर, धिरज सिंग, समीर शेलार, संग्राम खिलारी, हेमंत खत्री, संजय बडे, राहुल कातोरे, नितीन मुनोत, बाळासाहेब पोकळे, रोनक शेटिया, किरण बारस्कर यांचे सहकार्य लाभले आहे, तसेच वैयक्तिक पारितोषिकांसाठी शुअर शॉट सर्व्हिसेस, संदीप दरंदले, अजय दंडवते, अंकुश पवार, बाळासाहेब मोरे, शरद महापुरे, मिठास स्वीट, माऊली हॉटेल, योगेश तळेकर, सचिन दरंदले, अनिल पवार, ओम वायडिंग, संग्राम सगर, राजू शेख, अ‍ॅड. पोपटराव बडे, संतोष उगले सहकार्य करणार आहेत. याशिवाय स्पर्धा नियोजनासाठी विजय वाकळे, भरत रोडे, नवनाथ कातोरे, डॉ. प्रशांत सिनारे, दत्तात्रय सुंबे यांनी मदत केली आहे.सेमी फायनल व अंतिम सामन्यातील खेळाडूंंना अंबिका ग्रुपच्या वतीने वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये सलग चार षटकार 501, सलग चार चौकार 501, सलग तीन विकेट 501 याशिवाय सेमी फायनल प्रवेश केलेल्या संघातील खेळाडूंना टी-शर्ट देण्यात येणार आहे. हे सर्व सामने 6 षटकांचे असतील. सामन्याचे सर्व निर्णच पंचांकडे असतील. एका खेळाडूस एकाच संघाकडून खेळता येईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. नो बॉलला फ्री हिटचा नियम असेल. संघ वेळेवर उपस्थित न राहिल्यास विरोधी संघास विजेता घोषित केले जाईल. सर्व सामने वन हाफ पद्धतीने खेळवले जातील, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.संघांनी अधिक माहितीसाठी विशाल तिजोरे (7498954545), महिंद्र मोरे, (8999975026) व संजय बडे (9922707470) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त संख्येने या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अंबिका क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.मा. संपादक,दै.अहमदनगर. कृपया प्रसिद्धीसाठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here