दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘त्या’ प्रश्नाचे पूर्ण गुण..!

586

वादग्रस्त प्रश्नावरुन लोकसभेत सोनिया गांधी भडकल्या. महिलांविषयी वादग्रस्त उल्लेख असलेल्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमधील प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद थेट संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोमवारी (ता. 13) थेट लोकसभेतच हा मुद्दा उपस्थित केला.अखेर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (CBSE) जाग आली. मंडळाने इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला हा प्रश्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जाणार असल्याचेही मंडळाने जाहीर केले. ‘सीबीएसई’ बोर्डाच्या नियमावलीमध्ये हा प्रश्न बसत नसल्याने तो रद्द करण्यात येत असल्याचे बोर्डाने म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं प्रकरण काय?‘सीबीएसई’ बोर्डाची दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा शनिवारी (ता. 11) झाली. त्यात महिलांशी संबंधित एक परिच्छेत देऊन त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते, पण या परिच्छेदात महिलांबाबत मांडलेली काही विधाने अत्यंत आक्षेपार्ह होती.. याबाबत अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.“आजकाल महिला आपल्या पतीचे ऐकत नाहीत. त्यामुळे मुले व नोकरांमधील बेशिस्तपणा वाढला आहे.. स्त्री-मुक्तीमुळे मुलांवरील पालकांचा अधिकार संपला.. एक आई आपल्या पतीची पद्धत स्वीकारूनच आपल्या लहान मुलांकडून आदर मिळवू शकते..” अशी काही विधाने या परिच्छेदामध्ये केली होती.. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील हा वादग्रस्त प्यारेग्राफ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर ‘सीबीएसई’ बोर्ड सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आले.सोनिया गांधी भडकल्या…लोकसभेत सोनिया गांधी यांनी हा ‘सीबीएसई’च्या परीक्षेतील वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला. प्रश्नपत्रिकेतील हा उतारा महिलांविरोधी असून, ‘सीबीएसई’ बोर्ड आणि शिक्षण मंत्रालयाने तो तातडीने मागे घ्यावा व महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली.बोर्डाने काय म्हटलंय..?अखेर ‘सीबीएसई’ बोर्डाला उपरती झाली. बोर्डाने तातडीने नोटीस जारी केली. त्यात म्हटले आहे, की “दहावीच्या परीक्षेच्या इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या प्रश्नपत्रिकेच्या उताऱ्यांचा संच बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत नाही.”“उताऱ्यावरील अभिप्रायाच्या आधारे मंडळाने विषय तज्ज्ञांकडे आढावा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका पाठवली होती. त्यांच्या शिफारशीनुसार प्रश्नपत्रिकेतून उतारा क्रमांक 1 आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बदल्यात विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जातील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here