१)मोदींना पर्यायावर कन्हैयाकुमार म्हणाले; आजाराला पर्याय नसतो त्यावर इलाज करतात*देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय पर्याय काय असा प्रश्न विचारला जातो. मात्र, कोणत्याही आजाराला पर्याय विचारला जात नाही तर त्यावर इलाज केला जातो हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे सांगत कोरोनावरदेखील इलाज म्हणून लस शोधण्यात आल्याचे उदाहरण कॉंग्रेसचे युवा0 नेते कन्हैयाकुमार यांनी आज दिले*२)परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा*’विलीनीकरणाबाबत स्वतंत्र निर्णय घेवू शकत नाही’ ‘सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेवू”सोमवारपर्यंत न आल्यास कठोर कारवाई करणार असा इशारा परब यांनी दिला.*३)न्यायालयाची नवाब मलिकांनी मागितली बिनशर्त माफी*मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो – नवाब मालिकांची कोर्टात हमी*४)कॅटरिनाने विवाहबंधनात मात्र यांना नाही दिले निमंत्रण*बॉलीवूडमधील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ काल अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे धुमधडाक्यात लग्न केले. या लग्नाला १२० पाहुणे उपस्थित होते. *असं म्हटलं जात की, व्यक्तीगत आयुष्यात ज्यांच्यामुळे त्रास झाला अशा दिपीका पडूकोन, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर, सलमान खान व शाहरुख खान यांना मात्र लग्नाला सांगण्याचे तिने टाळल्याचे दिसून आले.*
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
ब्रेकिंग : ठाकरे सरकारकडून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याची घोषणा
पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: ही श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे आणि...
औरंगाबाद जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी 67 जणांना (शहर 37, ग्रामीण 30) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार...
पालकमंत्री हसन मुश्रीफ बुधवारी जिल्हा दौर्यावर भाळवणी येथील कोविड केअर सेंटरला देणार भेट पारनेर...
अहमदनगर: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बुधवार, दिनांक २६ मे, २०२१ रोजी जिल्हा...







