राष्ट्रीय लोकन्यायालयात १५ हजार २१ प्रकरणे सामंजस्याने मिटली
अहमदनगर:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या वतीने शनिवार (दिनांक ११ डिसेबर २०२१) आयोजित कऱण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत प्रत्यक्षरित्या कामकाज करण्यात आले. जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील तालुका न्यायालये यामध्ये एकूण १५ हजार २१ दाखल पुर्व प्रकऱणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीत परस्पर समझोता करुन प्रकरण निकाली काढले . जिल्हयामध्ये ७ हजार ७६३ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २४ ९२ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच तब्बल ५० कोटी १४ लाख २५ हजार ३११ इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. 
या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अँक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. 
लोकअदालतमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हजारो प्रकरणे मिटविण्यात आली. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये कोव्हीड-19 नियमांचे तंतोतंत पालन करून नागरीकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करून मिटविण्यात आली.
लोकन्यायालयाचे दिवशी बरेच नागरीक मैत्रीच्या संबंधासह आपसातले वाद मिटवून हसत बाहेर जाताना दिसून आले. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा न्यायाधीश क्र. 1 मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष अँड.अनिल सरोदे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशन अँड. एस.जे. काकडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्ध धटनेमध्ये वीरमरण आलेले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत व इतर अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बॅंका व महानगरपालिका,ग्रामपंचायत यांची दाखलपूर्व प्रकरणेही यामध्ये मिटवण्यात आली. ही लोकअदालत न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीतीने पार पडली. या लोकअदालतीमध्ये ठेवलेल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या ४९ हजार २७ इतकी होती. पैकी, तडजोडीने मिटविलेल्या प्रकरणांची संख्या ११ हजार ३५३ इतकी आहे. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सजविले होते.
पारंपरिक न्यायालयाला आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झालेले होते.महानगरपालिका आणि ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणे या मध्ये ठेवण्यात आली होती.
या साठी वेगळा मंडप व पक्षकरासाठी सुविधा यासाठी अनेक काऊंटर ठेवले होते. कर वसुली प्रकरणांना नागरिकां चा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सूत्र संचालन ॲड.अभय राजे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ॲड. स्वाती नगरकर यांनी केले.







