अहमदनगर |
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून औरंगाबाद ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येेेत आहे. औरंगाबाद येथून निघालेेला मोर्च नगर जिल्ह्यातदाखल झाला आहे. MIM चा मोर्चा नेवाशातील घोडेगांवजवळ दाखल झाला आहे. काही वेळातच नगरमध्ये दाखल होणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांचा मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा मोर्चा असून, अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर नगर पोलिसांनी अडवला होता.
ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहेदरम्यान, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. तसेच मुंबईत जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे.
त्यामुळे एमआयएमचा मोर्चा आता मुंबईत कसा प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर मुलूंड चेकनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलही तैनात आहे. पोलिसांकडून याठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. मुलूंड चेकनाक्यावर औरंगाबाद आणि नगर पासिंगच्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.




