जगभरात आणि देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 31 जानेवारीपर्यंत 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत.इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.मार्च 2020 पासून स्थगिती दिली आहे.भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर ‘वंदे भारत’ विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्याभारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर जिल्हा कल्याणकारी समिती तर्फे ज्याचा माल त्याची हमाली ची घोषणा
अहमदनगर जिल्हा कल्याणकारी समिती तर्फे ज्याचा माल त्याची हमाली ची घोषणा
देशाला पूर्व पाकिस्तानसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागेल: इम्रान खान यांनी राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर इशारा...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी चेतावणी दिली की गेल्या आठवड्यात त्याच्या नाट्यमय अटकेनंतर अशांततेच्या पार्श्वभूमीवर...
दिल्लीनंतर, वायू प्रदूषणामुळे मुंबई धुके झाली, एक्स प्रतिक्रिया
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून त्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास तसेच डोळ्यांना जळजळ होत आहे. केंद्रीय...
भूजल साक्षरता अभियानांतर्गत जलजागृती फिरत्या चित्ररथाचे हिरवा झेंडा दाखवून अनावरण
अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास...