अधिकाऱ्याने दम देताच घडलं भयंकर…! एसटी संपकरी महिलेची प्रकृती खालावली:

एसटी संपकरी महिलेची प्रकृती खालावली, अधिकाऱ्याने दम देताच घडलं भयंकर…

दोन्ही बाजूने माघार घेतली जात नसल्याने हे संप आणखी किती दिवस सुरू राहील याची अंदाज नाही. त्यात संपात फूट पडत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत असून, आत्तापर्यंत शंभर पेक्षा अधिक आगारातुन गाड्या सुरू असल्याचा दावा एसटी महामंडळकडून करण्यात आला आहे.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला आता एक महिना होत आला असून, अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. याचवेळी सरकार आणि अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचा दम दिला जात असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर असाच काही प्रकार औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात पाहायला मिळाला.

अधिकाऱ्याने कार्यवाहीचा दम दिल्याने महिला वाहकाची अचानक प्रकृती खालावली आहे.एकीकडे संप सुरू आहे तर काही ठिकाणी कर्मचारी कामावर हजर राहत आहे.सिल्लोड आगारात बुधवारी तीन कर्मचारी हजर झाल्याने पोलीस बंदोबस्तात २ गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

मात्र, याचवेळी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बसस्थानक पासून थोडं लांब संप करण्याचे सांगण्यात आले, ज्यामुळे झालेल्या वादानंतर महिला वाहक रत्ना देवराम पाटील चक्कर येऊन पडल्या.

त्यांना पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्यांना कोणतेही दम दिलं नसल्याचं आगार प्रमुखांनी म्हंटले आहे.

दोन्ही बाजूने माघार घेतली जात नसल्याने हे संप आणखी किती दिवस सुरू राहील याची अंदाज नाही.

त्यात संपात फूट पडत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत असून, आत्तापर्यंत शंभर पेक्षा अधिक आगारातुन गाड्या सुरू असल्याचा दावा एसटी महामंडळकडून करण्यात आला आहे. त्यातच आता काम नाही तर पगार नाही अशी भूमिका महामंडळकडून घेण्यात आल्याने आणखी काही कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here