सन फार्मा कंपनीला भीषण आग; नगरच्या एमआयडीसीत बंब, रुग्णवाहिका पोहोचल्या

सन फार्मा कंपनीला भीषण आग; नगरच्या एमआयडीसीत बंब, रुग्णवाहिका पोहोचल्या

अहमदनगर : एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत.

याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती कंपनीत पसरली आहे. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. आग लागली त्या ठिकाणी काही कामगार काम करीत होते. त्यांची निश्चित संख्या समजू शकली नाही.

आग लागली त्याच्याजवळ लिक्विड टँक आहेत. या टँकने पेट घेतला तर अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here