तमिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये बुधवारी (ता. 8) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात भारताचे संरक्षण प्रमुख (CDS) बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंब व लष्करातील काही अधिकारी प्रवास करीत असल्याचे समजते. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय हवाई दलानेही याबाबत ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरने स्वत: बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, लष्करी अधिकारी, सुरक्षारक्षक व कमांडोज असे 14 जण प्रवास करीत होते. एका कार्यक्रमासाठी हे सगळे हेलिकाॅप्टरमधून जात होते. तमिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये अचानक हे हेलिकाॅप्टर क्रॅश झाले. खराब हवामानामुळे हेलिकाॅप्टरला अपघात झाल्याचे सांगण्यात येते.. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसतेय. *घटनास्थळी बचावकार्य सुरू*या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जाते. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपीन रावत हेही या घटनेत जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू होते, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता..
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
12 वी चा निकाल शुक्रवारी किंवा शनिवारी जाहीर होण्याची शक्यता
12 वी चा निकाल शुक्रवारी किंवा शनिवारी जाहीर होण्याची शक्यता
कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर …
कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर …
मुंबई | कोरोनामुळे देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी जवळ...
मणिपूरला सोशल मीडियाच्या प्रवेशाशिवाय इंटरनेट परत मिळू शकते का, कोर्टाने विचारले
गुवाहाटी: अनेक व्यक्तींनी दाखल केलेल्या विनंत्यांनंतर, मणिपूर उच्च न्यायालयाने आज अंतरिम आदेशात राज्य प्राधिकरणांना त्यांच्या नियंत्रणाखाली काही...
योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे फोन टॅप करत आहेत, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. केंद्रीय संस्थांच्या...






