अहमदनगर : जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे याला विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सुनावली आहे.काकडे हे सध्या पाथर्डी पंचायत समितीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये काकडे हे कनिष्ठ अभियंता म्हणून होते. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल होता. या खटल्यातील वादीच्या महिला वकिल या न्यायालयात दि.10 जून 2010 रोजी जात होत्या. या महिला वकिलास अभियंता हर्षद काकडे यांनी धमकावून त्यांचा विनयभंग केला होता. या महिला वकिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काकडे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काकडे यांनी ही संबंधित महिला वकिलाविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी विनयभंग व धमकावल्याच्या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ॲट्रॉसिटी कायद्यातून संबंधित महिला वकिलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विनयभंगाच्या खटल्यात सरकारतर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडापैकी पाच हजार रुपये फिर्यादीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ॲड. केदार केसकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेत न्यु लॉ कॉलेज ला पारितोषिक.
अरकान जहागीरदार, अशिष सुसरे व कु. ऋतुजा करमरकर यांना उत्कृत मेमोरीयल मध्ये प्रथम तर मूट ट्रायल मध्ये...
हवामान अपडेट: मृतांचा आकडा 20 ओलांडल्याने, IMD ने हिमाचलमध्ये ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी...
भारतीय हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केले...
अडकलेला ट्रॅक्टर राजधानी एक्सप्रेसच्या लोको पायलटला आपत्कालीन ब्रेक लावण्यासाठी भाग पाडतो
नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेसच्या लोको पायलटला इमर्जन्सी ब्रेक लावणे भाग पडले कारण झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात प्रीमियर ट्रेन...
मुकुंदनगर येथील डेंटल कॉर्नर अँड इनप्लांट सेंटर येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर
मुकुंदनगर येथील डेंटल कॉर्नर अँड इनप्लांट सेंटर येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर
७५ व्या देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम...नगर...










