राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यांनी दाखल केले अर्ज
अहमदनगर : राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, नगराध्यक्षपद रिक्त होते. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
नुकतेच राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी (ता. 25) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे.