भारत विरुद्ध न्युझीलंडमधील दुसऱ्या टेस्टला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून सुरुवात झाली.. कॅप्टन विराट कोहलीने या टेस्टद्वारे पुनरागमन केले. मात्र, फिरकीपटू एजाज पटेलने त्याला शुन्यावरच पायचीत बाद केले. मात्र, विराटला बाद देण्याच्या पंचांच्या निर्णयावरुन आता वाद सुरु झालाय.. मैदानावरील पंचांनी एजाज पटेलच्या बाॅलिंगवर विराटला पायचीत बाद दिले. पंचाच्या निर्णयाला आव्हान देताना विराटने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचे दिसत होते. त्यामुळे टीव्ही अंपायरनेही मैदानावरील पंचांचाच निर्णय कायम ठेवला.. पंचांच्या निर्णयावर विराट समाधानी नव्हता. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने आपला राग व्यक्त केला. सीमा रेषेरजवळ त्याने जोरात बॅट आपटली. सोशल मीडियावरही नेटिझन्सनी पंचांच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. टीव्ही समालोचकांनीही या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले.*मयांकचे शानदार शतक*दरम्यान, टाॅस जिंकून प्रथम बॅटिंग करताना, टीम इंडियाचे शुभमन गिल व मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, संघाच्या 80 धावा झालेल्या असताना गिल (44) बाद झाला. नंतर पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा (0) नि कोहली (0) बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. मयांकने (नाबाद 120) सुरुवातीला श्रेयस अय्यर (18) व नंतर वृद्धीमान साहा (नाबाद 25) यांना जोडीला घेत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 4 बाद 221 धावा केल्या आहेत.. न्युझीलंडच्या एजाज पटेलने भारताच्या सगळ्या 4 विकेट घेतल्या.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
जिल्ह्यात 81330 कोरोनामुक्त, 15381 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1435 जणांना (मनपा 900, ग्रामीण 535) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 81330 कोरोनाबाधित रुग्ण बरे...
आता मुंबई मधील रेल्वे स्थानक चर्चगेट नव्हे _तर “चिंतामणराव देशमुख स्थानक” चर्चगेट रेल्वे स्टेशनला...
एका विस्मृतीत गेलेल्या महान भूमिपुत्राचा,असा गौरव करून शिंदेसेनेने आपल्या भावी राजकीय वाटचालीचा मार्ग सुनिश्चित केला आहे."संयुक्त महाराष्ट्र...
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवू असं म्हणणाऱ्या शिवसेना आणि भाजप...
Delhi Man’s Head Smashed With Frying Pan, Wife Killed Too By Ex-Employee
New Delhi:
A couple and their domestic help were murdered at their three-storey home...





