नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा

अहमदनगर प्रतिनिधी – नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मोकटे हा पीडितेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असे.” जर तू कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना चाकूने मारून टाकीन” अशी धमकी देत होता. त्या भीती पोटी पीडित गुन्हा दाखल करण्यास तयार होत नव्हती.

मात्र आज एका सामाजिक कार्यकर्ते च्या मदतीने तिने आज गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकारनात एकच खळबळ उडाली आहे.
पिडीतील फेसबुक वरून, मोबाईल वरून वारंवार त्रास देणे, अश्लील व्हिडिओ टाकणे तसेच घरी येऊन बळजबरीने त्रास देण्याचा प्रकार दोन वर्षे सुरू होता.

आरोपी मोकाटे विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याची पथके मोकाटे ला अटक करण्यासाठी रवाना देखील झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here