आरोपी तसेच मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या जामिनावरील सुनावणी लांबणीवर

औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे-पाटील यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे.

सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे आता दि. 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. या अर्जावर गुरूवारी (दि. 2) सुनावणी होती.

सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढ मागितल्याने आता दि.15 रोजी सुनावणी होणार आहे.

बोठे याच्या वतीने ॲड. भूषण ढवळे, ॲड. सुनील कर्पे, ॲड. निरंजन भावके, ॲड. आदित्य गुरव हे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here