कोरोनाच्या संसर्गामुळे आपली जवळची, घरातील, गावातील नातेवाईक अशी बरीच माणसे बहुतेकांना गमवावी लागली. आता राज्य सरकार कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह साहाय्य देणार आहे. यासाठीचा तसा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता.कसा कराल अर्ज? ▪️ कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह साहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्य शासनाने एक आर्थिक साहाय्य देण्यासाठी एक वेब पोर्टल तयार केलंय.▪️ आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने 26 नोव्हेंबर रोजी याबद्दलचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. ▪️ अर्जदाराने अर्ज करण्यासाठी mahacovid19relief.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तेथे लॉगिन करणे आवश्यक असेल. (वेबसाईटवरच आपल्याला वरील उजव्या बाजूस क्लिक केले की पीडीएफ स्वरूपात अधिक माहिती मिळेल.)अर्ज करण्याआधी लक्षात ठेवा:Advertisementअर्जदाराला, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीबद्दल आवश्यक माहीती-मृत्यू प्रमाणपत्र, रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन साहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येणार आहे. केंद्र शासनाजवळ ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील.अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.अर्ज मंजूर न झाल्यास काय करायचं?जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीला या प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सगळे अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास साहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
Devendra Fadnavis: आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही; आक्रोश मोर्च्यातून फडणवीसांचा सरकारला इशारा
Jal Akrosh Morcha: जालना शहरातील पाणी प्रश्नावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फडणवीस...
धनबाद इमारतीला भीषण आग, 15 ठार, पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत...
झारखंडमधील धनबादमध्ये मंगळवारी एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला.
धनबादमधील...
भारताने कॅनडासोबत ब्रॅम्प्टन मंदिराचे विद्रुपीकरण केले
भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडासोबत शीख फुटीरतावाद्यांचे प्रश्न उचलून धरले असताना, लंडन आणि ओटावा भाषण स्वातंत्र्याच्या...
नमिता थापर यांनी अनुपम मित्तल यांच्यावर 70 तासांच्या कामाच्या आठवड्याला पाठिंबा दिल्याबद्दल प्रतिक्रिया
Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी नारायण मूर्ती यांच्या 70 तासांच्या आठवड्याच्या विधानावर त्यांचे मत व्यक्त केले....