युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा तवले यांची निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या ३०० युवकांपैकी कृष्णा यांनी तिसरा क्रमांक मिळवत पहिल्यांदाच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला. त्यांच्या या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षाकडून कृष्णा यांचे कौतुक होत आहे.*युवक हा राजकारणातील दिशादर्षक असतो, असे म्हटले जाते, वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या “यंग इंडिया के बोल” ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक राज्यातून पाच याप्रमाणे देशभरातून ३०० स्पर्धक निवडण्यात आले होते.*दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत पंच म्हणून म्हणून माजी केंद्रीयमंत्री अजय माकण, इम्रान प्रतापगडी, दिल्ली महिला प्रदेशाध्यक्ष अल्का लांबा, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, राघीनी नायक, जैवीर शेरगील, प्रणव झा यांनी भूमिका बजावली. देशातील ३०० स्पर्धकातून तिघांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.*यामध्ये दिल्ली येथील अवनी बन्सल यांनी प्रथम, तेलंगणाचे विगेंद्र वर्मा यानी दुसरा क्रमांक मिळाला असून कृष्णा यांनी तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविले आहे. कृष्णा तवले यांचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील शेलगाव (जा) आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत.*
Home महाराष्ट्र उस्मानाबाद उस्मानाबादच्या कृष्णा तवलेंची तीनशे तरूणांमधून युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Day after woman stabbed to death in Pune, suspect found dead
Hours after a 22-year-old woman was stabbed to death in the Aundh area of Pune Wednesday afternoon,...
“राहुल गांधींनी व्हिडिओ काढला नसता तर…”: मिमिक्री रोवर ममता बॅनर्जी
नवी दिल्ली: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नक्कल करण्यावरून मोठ्या राजकीय वादाला तोंड फोडले आणि त्याला...
Aurangabad जिल्ह्याचा विविध क्षेत्रात सर्वांगिण विकास – पालकमंत्री सुभाष देसाई
• ई-पीक पाहणीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी• पोखरा प्रकल्पात वैजापूर प्रथम तर सिल्लोड द्वितीय क्रमांकावर
औरंगाबाद,दि....





