औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघ दत्तक देण्याची योजना.

675

या योजने अंतर्गत संग्रहालयातील वाघासह बिबट्या, कोल्हे, माकड, कासव आदी प्राणी दत्तक दिले जाणार._तुम्हाला जर वाघ सांभाळायची ईच्छा असेल तर ती आता पूर्ण होणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या दत्तक योजनेतून आपण वाघ दत्तक घेऊ शकता.▪️या योजनेत ज्या व्यक्तींनी, संस्थेने किंवा कॉर्पोरेट कंपन्यानी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे. सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात १४ वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव असे ३२० मोठे प्राणी आहेत.▪️मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी प्राणी संग्रहालयातील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी, मित्र, व्यक्ती, संस्था व कंपन्यांना दत्तक दिले जाणार आहेत. प्राणी दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here