बायोडिझेल प्रकरण दिलीप सातपुते यांच्यासह यांना अटक पूर्व जामीन काही अटी शर्तींवर मंजूर करण्यात आला

645

अहमदनगर शहरातील केडगाव बायपास तसेच नगर सोलापूर रोड वरील वाटेफळ या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी छापे टाकून बायोडीझेल विक्री करणारे रॉकेट पकडले होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे हे करत होते. या प्रकरणी जवळजवळ पंचवीस आरोपी निष्पन्न झाले आहेत काही आरोपींना अटकही करण्यात आली होती तर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचेही नाव आल्यानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली होती. दिलीप सातपुते यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती त्यांच्या अर्जावर आज ए एम शेटे यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर त्यांचा अटक पूर्व जामीन काही अटी शर्तींवर मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपींच्याया वतीने ऍड.सतीश गुगळे आणि ऍड.मोहसीन शेख यांनी बाजू मांडली सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.केसकर यांनी बाजू मांडली होती तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपीकुणाल नरसिंघानी, रोशन माखेजा, विशाल भांबरे, विक्रांत शिंदे ,राजू उर्फ राजेंद्र साबळे ,गौतम बेळगे, अशोक कोतकर ,मयूर बडे यांचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here