शेतमाल नोंदणीसाठी शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहन
अहमदनगर : केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मूग, उडीद खरेदीची प्रक्रिया नाफेडच्या वतीने मार्केटींग फेडरेशनच्या मार्फत राबविली जात आहे. दिनांक १५ सप्टेंबरपासून मूग, उडीद या शेतमालाची शेतकरी नोंदणी प्रक्रिया जिल्ह्यामध्ये ११ खरेदी केंद्रांवर सुरु करण्यात आली आहे. तरी, शेतमाल नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी पीक पेराचा उल्लेख असलेला सातबारा उतारा, आधारकार्डाची छायांकित प्रत, बँक पास बुकची छायाप्रत सादर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. बँक पास बुकची छायांकित प्रत सादर करताना रद्द केलेला धनादेश अथवा बँक खात्याबाबत पूर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट सादर करावे. सदरहू बँक खाते बंद अथवा जनधन योजनेतील नसावे याची दक्षता संबधितांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.
जिल्हयातील नोंदणी/खरेदी केंद्र व केंद्रावरील भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे. राहुरी- तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी (भ्रमणध्वनी क्रमांक 9665722815). संगमनेर- तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, संगमनेर (भ्रमणध्वनी क्रमांक 9850319568). पारनेर-कृषी उत्पन्न बाजारसमिती, पारनेर(भ्रमणध्वनी क्रमांक 9421555492). श्रीगोंदा – तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, श्रीगोंदा (भ्रमणध्वनी क्रमांक 9011957878). कर्जत- कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी, कर्जत (भ्रमण ध्वनी क्रमांक 9503031010). टाकळी खंडेश्वरी- कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी, कर्जत (भ्रमण ध्वनी क्रमांक ९४२३४६५१५१). जामखेड – यशवंत मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, जामखेड (भ्रमण ध्वनी क्रमांक 7218412412), जामखेड- शिवरत्न मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, खर्डा ता.जामखेड (भ्रमण ध्वनी क्रमांक 9422200001). पाथर्डी-जयभगवान मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, पाथर्डी (भ्रमणध्वनीक्रमांक 8329404135), शेवगांव- तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, शेवगांव (भ्रमणध्वनी क्रमांक 9011541646). अहमदनगर- कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर (भ्रमण ध्वनी क्रमांक 9021202301)





