करावाशहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदनअभिनेत्री कंगनाच्या बरळल्याने जनसामान्यांमध्ये पडसाद उमटत असल्याचा आरोपअहमदनगर(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन समाजाच्या भावना दुखावणार्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, राजू मदान, अर्जुन मदान, करण धुप्पड, सतीश गंभीर, रोहित बत्रा, राजा नारंग, राहुल बजाज, सिमर वधवा, सरबजितसिंह अरोरा, पूनित भूतानि आदी उपस्थित होते.सिने अभिनेत्री कंगना राणावतने 20 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी संबोधून आक्षेपार्ह मजकुर लिहिला आहे. कंगनाच्या या पोस्टनंतर शीख, पंजाबी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंगनाने वारंवार खलिस्तान हा शब्द वापरुन संपलेल्या मुद्दयाला परत जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसिध्दीत राहण्यासाठी सदर अभिनेत्री कोणत्याही मुद्दयावर बरळत असून, त्याचे पडसाद जनसामान्यांमध्ये उमटत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणी खार (मुंबई) पोलीस स्टेशनमध्ये कंगनावर 295 (अ) अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल झाला असून, त्याप्रमाणे शहरात तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 295 (अ) व देशद्रोहाबद्दल 124 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….सोशल मीडियावर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन समाजाच्या भावना दुखावणार्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, राजू मदान, अर्जुन मदान, करण धुप्पड, सतीश गंभीर, रोहित बत्रा, राजा नारंग, राहुल बजाज, सिमर वधवा, सरबजितसिंह अरोरा, पूनित भूतानि आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
राहुरी पोलीस ठाण्यात रुजू झाले पोलीस निरिक्षक राजेंद्र इंगळे
राहुरी,दि.३१ ऑगस्ट,– राहुरी पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरिक्षक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असून नव्यानेच बदलून आलेले पोलिस निरिक्षक राजेंद्र इंगळे यांनी पोलीस...
फळ विक्रेता तिच्या ग्राहकांनी टाकून दिलेला कचरा उचलतो, आनंद महिंद्रा प्रतिक्रिया
उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर अनेकदा वेधक पोस्ट शेअर करतात. विनोदी पोस्ट ट्विट करण्यापासून ते त्याचे ज्ञान जगासोबत...






