सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा?, शशिकांत शिंदे-ज्ञानदेव रांजणे समर्थकांमध्ये वादावादी

526

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवडणुकीकडं प्रामुख्यानं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. शशिकांत शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान निर्माण केलं आहे. पक्षाच्या बड्या नेत्यांनी समजूत काढून देखील रांजणे यांनी माघार घेतलेली नाही. आज मतदानाच्या दिवशी या कारणामुळे जावलीतील मेढा येथे दोन्ही उमेदावारांचे समर्थक आमनेसामने आले. अखेर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावली सोसायटी गटातून उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे हे एकमेकांविरोधात उभे आहेत. आज मतदानाच्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या आजच्या मतदानामध्ये तणाव निर्माण झालाय.

शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणार हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जावली तालुक्यातील मेढा मतदान केंद्रावर तणाव कायम आहे. शाब्दिक चकमक झाली होती, ती चकमक स्वत: मिटवली आहे. राडा झालेला नाही, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. राडा झालेला नाही माझ्यावर विश्वास ठेवा, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवार ज्ञानदेव रांजणेमुळे त्यांची जागा अडचणीत आहे का ?, असं विचारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी सावध पवित्रा घेतला होता. शिंदे यांच्या जागेला कसलीच अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी रांजणे यांची समजूत काढून देखील ते उमेदवारीवर ठाम राहिले.

खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटीलकृषी प्रक्रिया – शिवरूपराजे खर्डेकरगृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसलेभटक्या विमुक्त जमाती – लहू जाधवअनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंतऔद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here