आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश;
अहमदनगर :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मात्र ज्या नाकातोंडावाटे कोरोना शरीराच्या आत प्रवेश करतो आहे, तिथंच त्याचा नाश होऊ शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. नाका-तोंडात कोरोनाव्हायरसचा नाश करता येऊ शकतं आणि तेदेखील आयोडिनने असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे.
आयोडिनने नाक आणि तोंड स्वच्छ केल्यास कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची शक्यता कमी होते, संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. असं युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनने केलेल्या संशोधनात दिसून आलं आहे. शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये कोरोनाव्हायरसच्या नमुन्यावर अँटिसेप्टीक पोविडोन-आयोडिन (पीव्हीपी- I) चं सोल्युशन टाकलं.