Maharashtra Corona Update : दिलासा! राज्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

436

मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 833 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  2, 271रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 74 हजार 952 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे.

राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 249  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 97 हजार 693  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1002 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 45 , 94, 210 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 195 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 351 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2845 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,39,426 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2649 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495923 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात तीन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 849 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4719 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

 देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 302 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 3,44,99,925 वर पोहोचला आहे. तर या काळात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात  1,24,868 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जाणून घेऊयात, देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी… केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 267 रुग्णांनी गेल्या 24 तासांत जीव गमावला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं जीव गमावलेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 4,65,349 पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 1,752 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here