ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच लटकलेला मृतदेह, हिंगोलीत ट्रकचालकाची आत्महत्या

443

हिंगोली : वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील एका ट्रक मालकाने स्वत:च्या ट्रकला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या ट्रकमालकाचे नाव संजय हनुमंते असून त्यांनी एक्सलेटरच्या वायरणे गळफास लावून स्वत:ला संपवलं आहे. या घटनेमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील कनेगराव येथे संजय हनुमंते नावाचा एक ट्रकमालक राहत होता. ट्रक वाहतुकीच्या व्यवसायातून ते अर्थाजन करीत. मात्र ज्या ट्रकद्वारे ते पैसे कमवत त्याच ट्रकला त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. एक्सलेटरच्या वायरने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. कनेरगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कनेरगाव येथे शोककळा पसरली आहे. हनुमंते यांनी आत्महत्या नेमकी का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अशाच प्रकारे आत्महत्येची आणखी एक धक्कादायक घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली होती. या दुर्दैवी घटनेत कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी असे टोकाचे पाऊल उचले. या घटनेचा अधिक तपास आता शिरूर पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. पती समीर, पत्नी वैशाली आणि बहिण माया यांच्यात रात्री क्षुल्लक करणाने वाद झाला होता. या वादानंतर बहीण माया सातव हिने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती भाऊ समीरला मिळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी वाद निर्माण झाला. या वादातून समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन मग विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here