निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरमोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली आहे.मोदी यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामगचा उद्देश होता. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.मोदी यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामगचा उद्देश होता. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती, असं त्यांनी सांगितलं.शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले, आम्ही एमएसपी वाढवली, रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडलं. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू लागला. आम्ही बाजार समित्यांच्या विकासावर काम केलं, असंही त्यांनी सांगितलं आहे.मोठी बातमी शेतकऱ्यांचा विजय मोदी सरकार कडून तीन कृषी कायदे मागे. मोदी सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा जन आक्रोश पाहायला मिळाला देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत होते या आंदोलनाला अनेक वेळेला गालबोट लागलं व यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले या संपूर्ण आंदोलनाच्या बातम्या सुरुवातीच्या काळात माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर झळकत होत्या यात अनेक माध्यमांनी गोदी मीडिया ची भूमिका उत्तम पद्धतीने बजावली हे आपण पाहिलं मात्र अखेर मोठ्याप्रमाणावर संघर्ष केल्यानंतर अखेर आता शेतकऱ्यांचा विजय झाला आहे मोदी सरकारने हे तीन कृषी कायदे मागे घेतले असल्याचा सांगितलं व शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आव्हान केले मात्र हे कायदे मागे घेतल्यानंतर सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे का? शेतकऱ्यांना एवढा त्रास होत असताना कायदे मागे घेण्यासाठी एवढा उशीर का? मोदी सरकार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांचं राजकारण करू पाहते आहे का? मोदी सरकारला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा आहे का? इत्यादी सवाल उपस्थित होत आहेत भारत हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो मात्र कृषिप्रधान देश म्हणणाऱ्या भारतात देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या न्यायासाठी एवढा संघर्ष करावा लागणे म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल मात्र मोदी सरकारला जाग आली आहे कदाचित ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आली असेल मात्र संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा या माध्यमातून का होईना पण विजय झाला आहे हे मात्र निश्चित