जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने अग्निडाग दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे. जवान मंगलसिंग परदेशी यांना सुमारे 14 वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी होते. जवान मंगलसिंग परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
“कोणत्याही पक्षाने मणिपूरच्या मेईटीसला पाठिंबा दिल्याचे दिसले…”: मिझोराम निवडणुकीवर जोरमथांगा
गुवाहाटी: मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा त्यांच्या पक्ष मिझो नॅशनल फ्रंट (MNF) साठी प्रत्येक वेळी रस्त्यावरील कोपरा सभा घेतात,...
आज भिडणार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 29व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) आज एकमेकांशी भिडणार आहेत.
बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याच्या प्रस्तावित कायद्याबाबत आसामने सूचना मागवल्या आहेत
गुवाहाटी: आसाम सरकारने सोमवारी सार्वजनिक नोटीस जारी करून राज्यातील बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याच्या प्रस्तावित कायद्यावर नागरिकांकडून सूचना मागवल्या...
मुख्यमंत्र्यांवरील सस्पेन्स संपणार? भाजप निरीक्षक छत्तीसगडमध्ये पोहोचले
नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून पक्ष नुकताच सत्तेवर आलेल्या राज्यात मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीला अंतिम रूप देण्यासाठी...




