कोल्हापूर दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित जाहीर केलेला छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून अचूक मतदार याद्या तयार कराव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिल्या. प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले, 1 नोव्हेंबर रोजी अस्तित्वात असलेली प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत असणारे दावे व हरकती 20 डिसेंबर पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीबाबत असलेल्या हरकती व दावे निकाली काढून नवीन नोंदणी केलेल्या मतदारांचा समावेश करुन ५ जानेवारीस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यात मतदान केंद्रामध्ये वाढ झाली असेल किंवा मतदान केंद्राची जागा बदलली असेल तर तसा बदल मतदार यादीमध्येही झाला असल्याची खात्री करावी. मतदार यादी संदर्भातील कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या. मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मृत्यू झालेल्यांची नावे वगळणे तसेच मतदार यादीतील फोटोबाबतची प्रकरणे याबाबत आवश्यक खातरजमा करुन कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक गावात, महापालिका, नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मतदार यादीचे वाचन करण्यात येऊन मयत नावे वगळण्याबाबत कार्यवाही करावी. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याबरोबरच शालेय, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करावे. बचत गट मेळाव्यामधून मतदार नोंदणीसाठी जागृती करावी, अशा सूचनाही प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिल्या.
Home महाराष्ट्र कोल्हापूर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाप्रधान सचिव तथा मुख्य...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
दिल्ली पादचारी पुलाच्या लिफ्टच्या शाफ्टमध्ये चिरडून एकाचा मृत्यू
नवी दिल्ली: दिल्लीतील मालवीय नगर येथील फूट ओव्हरब्रिजच्या लिफ्ट आणि भिंती यांच्यामध्ये अडकल्याने एका २५ वर्षीय व्यक्तीचा...
कार नदीच्या पाण्यात पडली ; पोहणे येत असल्याने चालक बचावला
कार नदीच्या पाण्यात पडली ; पोहणे येत असल्याने चालक बचावला

Slider
1920 मध्ये ‘अल्पसंख्याक’ ची संकल्पना नाही, मुस्लिम म्हणाले की ते एक राष्ट्र आहेत: AMU...
30 जानेवारी रोजी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) अल्पसंख्याक दर्जाबाबतच्या सुनावणीदरम्यान भारताच्या सर्वोच्च...
नेतेचा विधासभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी केले विष प्राशन !!!
या बाबत सविस्तर वृत्त असे की कन्नड विधासभा मतदार संघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्याच माजी...




