मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे ‘प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट’ या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते. सध्या त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची न्यायप्रविष्ट प्रकरणं असल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्र सदन घोटाळा, हेक्सवर्ल्ड यांसह अन्य काही हायप्रोफाईल प्रकरणांचा यात समावेश होता. मुळचे नाशिकचे असलेले न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील अनेक आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं होतं. ज्यात समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबिय आणि अन्य आरोपींचा समावेश होता.इतकंच नव्हे तर सोमवारीही एच.एस. सातभाई यांच्या कोर्टात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रिमांड, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन तर एकनाथ खडसे यांचं भोसरी प्रकरणही सुनावणीसाठी होतं.
- English News
- Conference call
- Lawyer
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- कलकत्ता
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- देश-विदेश