घरबसल्या काढा डुप्लिकेट मतदार ओळखपत्र, अशी आहे प्रोसेस..!

510

सरकारी वा निमसरकारी कामासाठी आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्र देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे ही सगळी कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.. मात्र, बऱ्याचदा नजरचुकीने ती गहाळ होतात नि डोक्याला हात लावण्याची वेळ येते..मतदार ओळखपत्र हरवल्यास काय करायचे, असा प्रश्न पडला असेल, तर नो टेन्शन..! आता घरबसल्या तुम्हाला नवे मतदार ओळखपत्र काढता येते. त्यासाठीची प्रोसेस जाणून घेऊ या..*डुप्लिकेट वोटर कार्डची प्रोसेस*▪️ डुप्लिकेट मतदार ओळखपत्र पुन्हा काढण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा. तेथे तुमचे खाते तयार करा नि लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला ‘e-EPIC’ डाऊनलोड करावे लागेल.▪️ नंतर तुमचा ‘e-EPIC’ क्रमांक किंवा संदर्भ क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर डिजिटल कार्ड डाऊनलोड करू शकता.▪️ तुमच्‍या कार्डवर नोंदणीकृत क्रमांक वेगळा असेल, तर कार्ड डाऊनलोड करण्‍यासाठी प्रथम तुम्‍हाला ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.▪️ ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण होताच नोंदणीकृत नंबरवर मेसेज येईल. त्यानंतर डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.▪️ डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी काही तपशील द्यावे लागतील. त्यात पूर्ण नाव, राज्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि अर्ज करण्याचे नेमके कारण टाकावे लागेल. मतदार ओळखपत्र हरवले वा चोरी झाले असेल, तर पोलिसांत तक्रार करुन त्या ‘एफआयआर’ची प्रत द्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here