• नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना • प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध उपाययोजना नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील सर्व आगारांना संपाच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे पुढीलप्रमाणे खाजगी बस, स्कूलबस व जीप टाईप वाहने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 120, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 43, दि. 10 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 126, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 52, दि. 11 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 116, स्कूल बस 9, जीप टाईप वाहने 45, दि. 12 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 122, स्कूल बस 17, जीप टाईप वाहने 63 याप्रमाणे एकुण खासगी बस 484, स्कूल बस 40 तर जीप टाइप वाहने 203 उपलब्ध करुन दिली आहेत.संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने याबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास किंवा जादा भाडे दर आकारले असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर संपुर्ण तपशीलासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.संपाच्या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी परिवहन विभागातील अधिकारी, पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक, एस.टी. खात्यातील वरिष्ठ अधिकारी व खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस व इतर वाहन संघटना यांच्या प्रतिनीधीची बैठक आज आयोजित केली होती. प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व एसटी महामंडळाचे आगार प्रमूख यांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात बेमुदत संप पुकारला असल्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 9 आगार असून 540 बसेसच्या माध्यमातून दररोज 80 हजार प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे 80 हजार प्रवाशांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर, देगलूर, बिलोली, किनवट, माहूर, हदगाव, मुखेड, कंधार येथील एस.टी. आगारामध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. आगार प्रमुखांची भेट घेऊन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खाजगी बसेसची आवश्यकता असल्यास कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
‘दुसरा पोस्ट करणार…’: महुआ मोइत्रा आता पीएम मोदींवर बीबीसी डॉक्युमेंटरीचा भाग २ शेअर करते
गेल्या आठवड्यात, महुआ मोइत्रा आणि आणखी एक टीएमसी खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी वादग्रस्त माहितीपटाची लिंक शेअर केली...
कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर….
भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावत धक्का दिला. यासोबतच H-1B...
नौदलात सामील होणारे भारतीय नौदलाचे नवीनतम सर्वेक्षण जहाज INS संध्याक काय आहे?
भारतीय नौदलाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत शनिवारी विझागमधील...




